
काय हिंदूंनो षंढ झालात का ? श्रीगुरुदेव सेनेने उपस्थित केला प्रश्न.
वणी :- प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी कुत्र्याच्या अंगावर भगवे वस्त्र परिधान करून मिरवणुकीत फिरवून तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. तात्काळ या घटनेची जाहीर माफी भारतीय जनता पार्टीने मागावी अन्यथा श्रीगुरुदेव सेना आक्रमक भूमीका घेतील असा इशारा श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी एका प्रसिद्धीतून दिला आहे.
भगवा म्हणजे देशातील १०० कोटी हिंदूंची आस्था आहे परंतु या भगव्याचे ठेकेदार आरएसएस आणि भाजप च्या हिंदू द्रोह्यांनी काही केलं तरी आम्ही मुखात मुग गिळून गप्प बसायचं हीच शिकवण या बेगळी हिंदुत्ववादी बुजगव्हाण्यांनी आमच्या डोक्यात शिरवल आहे त्यामुळे आम्ही बंड करण्या ऐवजी षंढ होऊन बसलो आहे. म्हणून आमच्या भावनेवर अश्या कृत्याचा कोणताच परिणाम होताना दिसून येत नाही आहे.
भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्यांनी चक्क कुत्र्याला भगव्या वस्त्र परिधान करून हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या जयंती निमित्य निघालेल्या मिरवणुकीत फिरवून चक्क भागव्याचा अपमान केला आहे. एवढेच नाही तर भगवा हा वारकरी धर्माची पताका असून छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज आहे. एवढेच नाही तर प्रत्येक हिंदू समजणाऱ्या हिंदू बांधवांचा अभिमान आहे. परंतु एका कुत्र्याला भगवा परिधान करून भारतीय जनता पार्टीने हे दाखवून दिले आहे की, भगव्याला मानणारे तमाम हिंदू बांधव हे कुत्र्याच्याच लायकीचे आहे. असा निकश यावरून निघत असताना देखील स्वताला हिंदुत्ववादी हिंदूंचे ठेकेदार बनलेले आर एस एस आणि इतर हिंदुत्ववादी संघटना आपले तोंड बंद करून का बसल्या आहे. हेच कृत्य एखाद्या मुसलमानांनी किव्हा अन्य जातीधर्माच्या लोकांनी केलं असत तर आतापर्यंत या बेगळी बोगस हिंदुत्ववाद्यांनी देश पेटवून टाकला असता पण अस काही झालं नाही. देशात अराजकता माजविणे याचे आम्ही समर्थक नाही परंतु कोणीही असा हिंदूंचा आणि भागव्याचा अपमान करीत असेल तर तो आम्ही एक शिवरायांचे हिंदू म्हणून अजिबात सहन करणार नाही
ज्यांनी हे कृत्य केलं त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल कारण आमच्या मनगटात शिवारायांनी शिकवलेलं हिंदुत्वाच सळसळत रक्त आहे. जानव आणि शेंडीच बेगळी हिंदुत्व नाही
इतिहास साक्ष आहे हे आर एस एस आणि भाजपातील शेंडी आणि जाणवधारी कधीच हिंदू नाही आज ही ते हिंदू नाही केवळ हिंदूंच्या मतांवर सत्ता भोगायला हिंदुत्वाची चादर पांघरून आम्हला मूर्ख बनवत आहे. आणि हिंदूंच्या नावाखाली आमच्यावर राज्य करीत आहे. जर हे हिंदू असते तर या अपणाच्या विरुद्ध बंड करून उठले असते.
वणी जि. यवतमाळ येथे हिंदूंच्या भगव्याचा एवढा अपमान झाला असताना मागील पाच दिवसापासून हे भाजपाई, आर एस एस ,बजरंग दल, आणि इतर संघटना पिचवड्यात शेपूट घालून बसून आहे. फक्त हिंदूंचा वापर मुस्लिम विरोधात वापर कारन्या इतपत त्याचा वापर करत आहे . कारण यांना ना हिंदूंच्या भावनेचा आदर आहे नाही हिंदूंच्या भगव्याचा सन्मान आहे. कारण हे हिंदू नाही हे यावरून आजही सिद्ध होत आहे.
भगवा हा आमच्या हिंदूंचा सन्मान,अभिमान, आन,बाण आणि शान आहे कोणालाही असा भगव्याचा अपमान करता येणार नाही.
एवढा अपमान जर कोणी हिंदू सहन करीत असेल तर तो हिंदू नाही तर षंढ आणि थंड झालेला गुलाम हिंदू आहे.
वणीत भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचयत समितीवर त्यांचे राज्य होते. नगर पालिकेवर ५ वर्ष सत्ता भोगली एवढंच नाही तर देशात सत्ता यांचीच आहे. यांना हिंदुवर राज्य करण्याचा आता कोणताच अधिकार उरला नाही.
तमाम हिंदूंच्या आस्था असलेल्या भगव्याला कुत्र्यावर परिधान करून तमाम हिंदूंची भावना दुखवणाऱ्यां भाजपला १०० कोटी हिंदूं बांधवाची माफी मागावीच लागेल अन्यथा आम्ही एक हिंदू म्हणून आक्रमक पवित्रा घेण्यास तयार आहोत आम्ही षंढ झालेले थंड हिंदू नाही तर अन्यायाच्या विरुद्ध बंड करून उठणारे शिवरायांचे हिंदू आहोत.
जय शिवराय , जय भगवा जयतु
