भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

हिंगणघाट तालुक्यातील येरला येथे दिनांक 14 एप्रिल ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री जयंतराव कातारकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती येरला यांच्या व उपस्थित सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री अनिल राव खंडाळकर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री अमोलराव तेलंगे श्रीमती शुभांगीताई नगराळे श्रीमती सीमाताई टापरे व काही पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री कुंभारे सर यांनी केले त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ची माहिती मुलांना सांगितले तर शाळेचे शिक्षक श्री पेंदोर सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्य व संविधानिक कार्य याविषयी माहिती सांगितली. तर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमती शुभांगीताई नगराळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सुंदर गीत गायन केले कार्यक्रमाचे संचालन श्री बारापात्रे सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयंतराव कातरकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या शिक्षणाविषयीची तळमळ समाजसुधारणेचे कार्य आणि संविधानाविषयी त्यांचे मोलाचे कार्य याविषयी मार्गदर्शनपर केले. शाळेच्या विद्यार्थिनी कु. आर्या बोधे व कु. रश्मी वावरे यांनी सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगीतली .कार्यक्रमाच्या शेवटी आभार श्री पेंदोर सर यांनी मानले.