
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारे प्रवर्तक जैन धर्माचे चोवीस वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती दिं १४ एप्रिल २०२२ गुरुवारला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संपूर्ण जगाला दोन वर्षापासून कोरोना आजाराने घेरले होते त्यामुळे लॉकडाऊन व वेळोवेळी लागू होणाऱ्या निर्बंधांमुळे देशात सर्व धार्मिक कार्यक्रम वर बंदी घालण्यात आली होती मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने निर्बंध हटविले आहेत त्यामुळे सर्व धार्मिक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे होताना दिसत आहे. राळेगांव येथे १४ एप्रिल रोजी भगवान महावीर यांची जयंती जैन समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून जैन बांधवांच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली या फेरीमध्ये सहभागी जैन समाजाच्या महिला पुरुष युवक-युवती भगवंताचा जयघोष करत जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान महावीर जयंती निमित्त मंदिरात दिवसभर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मंदिरावर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी भगवान महावीर जयंती निमित्य जैन समाज संघाचे अध्यक्ष कांतीलाल बोथरा, डॉ हेमंत गांधी, सुभाष गुंदेचा, दीपक बोरा, प्रवीण कटारिया, उमेश बोरा, पवन छोरिया, सुभाष मुनोत, संजय बोथरा, प्रफुल बोथरा, विनय मुनोत, दीपक वर्मा, प्रितेश वर्मा, बोथरा, दिलीप काळे, गोरे सर, जितेंद्र चोरडिया, गुड्डू मेहता,आदी उपस्थित होते.
