खडकी येथील परिवर्तन पँनलचा दणदणीत विजय

राळेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेते एडवोकेट प्रफुल भाऊ मानकर व माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके सर यांच्या नेतृत्वावर लढलेली महत्त्वाची सोसायटी

तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 9529256225

  राळेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेते एडवोकेट प्रफुल भाऊ मानकर व माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके सर यांच्या नेतृत्वावर लढलेली महत्त्वाची सोसायटी खडकी येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था र।नं ५९७ खडकी या संस्थेवर परिवर्तन पँनल म्हणजे देविदास आडकुजी तेलतुंबडे यांच्या गटाचे १३ पैकी ८ उमेदवार विजयी  झाले आहे. यात देविदास आडकुजी तेलतुंबडे, देविदास नारायण काळे, अशोक गुलाबराव जवादे, मधुकर पांडुरंग बैलमारे,शेखर नथ्थुजी वाभिटकर, योगेश देविदास तेलतुंबडे, मंदाकिनी देविदास वाभिटकर, शकुंतला रमेशराव चौधरी, हे विजयी झाले तर या विजयाचे श्रेय माणिकराव चौधरी, हेमंत वाभिटकर, राजू येपारी,बालु बागमार,रवी खोंडे, उरकुडा जुनघरे,प्रफुल्ल पढाल,प्रमोद केराम, रवींद्र जवादे, हरिभाऊ सोनटक्के, पुरूषोत्तम जीवने यांना देण्यात आले.