वाशीम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी यांची बैठक संपन्न


आज उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे एस डी पी ओ मा .पुजारी,पोलीस निरीक्षक वाशीम शहर मा. शेख यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ सोबत चर्चा करण्यात आली कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही गृह खात्याच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल असे प्रतिपादन पुजारी साहेब यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे म्हणाले आम्ही कायदा सुव्यवस्था आबाधीत ठेवू मात्र अनधिकृत भोंग्यावर कायद्यानुसार कार्यवाही आपण करावी अन्यथा मा राजसाहेब यांच्या आदेशानुसार धोरण ठरेल यांची जवाबदारी प्रशासनाची राहील विधी सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड नामदेव जुमडे यांनी २००० पाच च्या कायद्याची अमलबजावणी आपण करावी याबाबत जिल्ह्यात सुचना देण्यात हि मघानी केली,आम्ही सामाजिक विषय घेतला आहे त्यामुळे कोणीही या विषयास जातीयवाद निर्माण होईल असे कृत्य करत असेल तर त्यावर कठोर कार्यवाही करावी या बैठकीस जिल्ह्यातील वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वैरागडे प्र जिल्हा उपाध्यक्ष केशव गरकळ प्र शहर अध्यक्ष रिसोड संजय येवले मालेगाव प्र ता अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी शेतकरी सेने चे प्र तालुका अध्यक्ष गजानन कुटे प्र शहर अध्यक्ष कृष्णा इंगळे,रितेश देशमुख प्र शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले,प्रतिक कांबळे,उमेश टोलमारे महिला सेनेच्या सीता धंदरे स्मिता जोशी रेणुका डांगे सौ वंदना अक्कर विकास देवकर सतिश देशमुख महेश कदम प्रकाश कवडे शंकर राऊत गणेश केदार आदी उपस्थित होते.