वरध येथे जात प्रमाणपत्राचे वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)


राळेगाव तालुक्यातील वरध येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त मा.अमोलजी येडगे साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कल्पनेतून यवतमाळ या आदिवासी बहुल जिल्ह्यामधील मागासवर्गीय कोलाम पोड/पारधी बेडा/तांडावस्ती येते जातीचे प्रमाणपत्र महत्वाचा दस्तऐवज वाटप करण्याच्या योजने करिता मा.शैलेशजी काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव, मा.डॉ.रविंद्रजी कानडजे तहसीलदार राळेगाव, श्री दिलीप बदकी निवासी नायब तहसिलदार राळेगाव यांचे मार्गदर्शनाखाली राळेगाव तालुक्यातील वरध मंडळ येथे कोलाम पोड,तांडा वस्ती येथील 84 जातप्रमाणपत्राचे वाटप शिबिरात करण्यात आले. शिबिराकरिता मा. शैलेशजी काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव, मा.दिलीप बदकी निवासी नायब तहसीलदार राळेगाव, श्री. रोहित भोरे तांत्रिक अभियंता उपविभागीय कार्यालय राळेगाव ,ए. एन. कणसे मंडळ अधिकारी वरंध व गावातील गावकरी, विद्यार्थी, विद्यार्थीनी व महिला उपस्थित होत्या. शिबिराकरिता श्री.राजेंद्र तुमराम तलाठी वरंध, उमेश टेकाम कोतवाल वरंध, दिनेश पेंदोर कोतवाल खैरगाव का. प्रवीण कळसकर पोलीस पाटील वरंध यांनी विशेष परिश्रम घेतले.