
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
भारत रत्न माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांचा जन्म दिवस देशभर वृत्तपत्र वितरक दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचाच एक भाग महणून राळेगाव येथील वितरक संघटना आणी राळेगांव तालुका पत्रकार संघटना यांच्या सयुक्त विद्यमाने भारतीय वृत्त पत्र वितरक दिन साजरा करण्यात आला .
दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि बसस्थानक येथे राळेगाव येथील वृत्त पत्र विक्रेते यांचा या वेळेस राळेगांव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला . जेष्ट वितरक विनोद काळे , राजू काळे यांनी आजचा दिवस आम्हा वितरकांना सन्मान देणारा आहे. अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या राळेगांव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ रोहणकर यांनी वितरक हा वृत्तपत्राचा कणाच असल्याचे सांगीतले सर्वच वितरकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला . वितरकांना फुल गुच्छे देऊन छोटेखानी माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस भारतीय वृत्तपत्र वितरक दिवस म्हणून साजरा करण्यात आला
यावेळी राळेगाव ता पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ रोहणकर ,प्रकाशभाऊ खूडसंगे, वितरक विनोदभाऊ काळे दैनिक देशोन्नती, राजूभाऊ काळे लोकमत, अजय राजकोल्हे सकाळ, दै . हिंदस्थान चे संजयभाऊ दुरबुडे , दै पुण्य नगरी, लोकसुत्र चे किरणभाऊ हांडे, राहुल गांधी, नरेश धामंडे, ठाकरे मनिष वाघ होते .
