
भारतीय नारी रक्षा संघटना, जिल्हा यवतमाळ, व शाखा राळेगाव,कळंब बाभुळगाव तर्फे निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जिल्हा यवतमाळ तील जे सर्वत्र चर्चा आहे,ता.बाभुळगाव येथील मादणी या गावात जे अमानूष कृत्य झाले आहे,जन सामान्यां मध्दे त्या प्रकरनाची चर्चा व भीतीचे वातावरन तयार झाले आहे,आज मुलीला स्वतः च्या घरातच सुरक्षता नाही,बापानेच मुलीचे लैंगिक शोषण व नरबळी ची तयारी केली पन त्या धाडसी पोरीन त्या सगळ्यांचे डाव पस्त केले,व हे प्रकरण लक्षात येताच तिच्या सर्तकतेने हे अमानुष कृत्य थांबले , माणुसकीला काळीमा फासनारी ही घटना आहे, त्या मुलीने मोठ्या हिम्मती ने हे प्रकरण उघडीस आणले,आणि पोलीस प्रशासनाने अविलंब त्या प्रकरणातील पिडीतेचे प्राण वाचविले आणि सगळ्या आरोपींना ताबडतोब जेर बंद केले पन या सगळ्यां आरोपींना दया भाव न करता त्या पिडीतेवर आप बिती लक्षात घेऊन सगळ्यां आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच त्या नराधम पित्याला फाशीची शिक्षा व्हावी ह्या मागणी साठी आज दि.२९-४-२२ ला या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच त्या पिडीत मुलीला संरक्षण व न्याय देण्यात यावा,ह्या साठी भारतीय नारी रक्षा संघटना, जिल्हा यवतमाळ, व शाखा राळेगाव,कळंब बाभुळगाव येथे ठाणेदार साहेब , तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले,ह्या वेळी शाखा राळेगाव येथुन भारतीय नारी रक्षा संघटना च्या ,सौ.संतोषीताई वर्मा,अँड सौ.रौशनीताई कामडी/वानोडे,सौ.सारीकाताई मुके,राजजी वर्मा,शैलेश आडे,शाखा कळंब येथुन भारतीय नारी रक्षा संघटना च्या सौ.वैशालीताई लखपति,दिनेशभाऊ वानखेडे,सौ.सपनाताई कोठारी,किशोरीताई मानकर,सपनाताई राऊत,सुषमाताई धनरे,मेत्रेताई,वंदनाताई राऊत,शाखा बाभुळगाव येथील,सौ.ललिताताई वर्मा, सौ.मंगलाताई चैने,नेहाताई बहाळे,सौ.हेमलताताई काळे,सौ.दिक्षाताई खांडरे, सौ.कुसुमताई खंडेराव,सौ.रूपालीताई फुलकर,सौ.जयश्री ताई गिरी,वरिल सगळे निवेदन जिल्हा यवतमाळ च्या सुचने वरुन व सौ.संतोषीताई वर्मा यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.
