
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे
महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय वाढोणाबाजार तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ च्या वतीने रिधोरा येथे नुकतेच पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या पालकसभेचे अध्यक्षस्थान श्री उमेशभाऊ गौळकार सरपंच रिधोरा यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जितेंद्र शेंडेकर, श्री ढगेश्वर मांदाळे पोलीस पाटील रिधोरा, श्री भानूदासजी आडे तंटामुक्ती अध्यक्ष, श्री अनंतराव वाढई हे उपस्थित होते. या पालक सभेत वर्ग अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नियमिततेबाबत, अभ्यासाबाबत, पालक-शिक्षक संवादाबाबत, महाविद्यालयाच्या ध्येय -धोरणाबाबत, महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमाबाबत,महाविद्यालयाच्या यशा बद्दल चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक शामसुंदर चलाख यांनी केले तर आभार प्रा. गजानन रंदळे यांनी व्यक्त केले यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
