आदिवासी तरुणांनी उद्योजक व्हावे:अँड. प्रमोद घोडाम यांचे समाजप्रबोधन मेळाव्यात प्रतिपादन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगांव : सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक न्यायनिर्णय दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करुन शासकीय सेवेतील गैरआदिवासींनी बळकावलेल्या घटनात्मक राखीव जागा रिक्त करुन अद्यापही भरण्यात आलेल्या नाहीत.समाजाच्या पदभरती ची लढाई संपलेली नाही. कधी होईल हे सांगता येत नाही.अशा परिस्थितीत यशस्वी जीवन जगण्यासाठी उच्चशिक्षित आदिवासी तरुणांनी हताश न होता शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन व्यवसायाकडे वळावे. आणि यशस्वी उद्योजक व्हावे. यातून आपणच लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्याल. असे प्रतिपादन ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम यांनी केले. ते राळेगांव तालुक्यातील खैरगाव येथे ९ मे रोजी आयोजित समाजप्रबोधन मेळाव्यात बोलत होते. या प्रसंगी
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अमरावती विभागाचे अध्यक्ष तथा पंचायत समिती पांढरकवडाचे माजी सभापती, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रितेशभाऊ परचाके, ट्रायबल फोरम नागपूरचे जिल्हाध्यक्ष शामभाऊ कुमरे,जंगोदाई पेनठाणा पांढरकवडाचे सदस्य संतोष पेंदोर,संतोष पेंढारवार,राळेगाव तालुका अध्यक्ष शंकर पंधरे,उपाध्यक्ष सुनील भाऊ मेश्राम, तालुका महासचिव संजीव मडावी,सहसचिव धीरज मेश्राम आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.पुढे अँड.घोडाम म्हणाले की,समाजाच्या अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी, समाजाला आर्थिक उन्नतीकडे नेण्यासाठी समाज संघटनांकडे प्लँन,नियोजन तयार असले पाहिजे.अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष रितेश परचाके यांनीही समाजातील शिक्षण, अंधश्रध्दा, व्यसनाधीनता , बेरोजगारी,ग्रामीण भागातील मुलभूत समस्या यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसा मुंडा, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले.गावातील व परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव मडावी, सूत्रसंचालन मधुकर परचाके तर आभार शंकर पंधरे यांनी मांनले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम मडावी, अमर सिडाम, पंकज उईके, अमित उईके, शंकर मेश्राम, समिर परचाके , प्रमोद मेश्राम, सुनील सिडाम,मिलिंद सिडाम,चेतन सोयाम,दयानंद उईके,गणेश मेश्राम, बाबाराव नैताम,शशिकांत गेडाम,सागर मेश्राम,राहूल नैताम,संदीप मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम,संजय मेश्राम, अर्जून उईके,हर्षल तोडासे,शंकर भलावी,विलास भलावी,आतिश वड्डे,अजय वड्डे,संजय वड्डे,सुरज मेश्राम,आकाश तोडासे,विकास तोडासे,अविनाश मेश्राम,रुद्रा कुळसंगे,राजू कुळसंगे,अंकुश वड्डे,सतिश मेश्राम,अजय जुमनाके, सुरज मेश्राम, राजू जुमनाके,संतोष जुमनाके, जयपाल पेंदोर,गोलू मडावी, दिनेश पेंदोर,दिनेश गाजरे यांनी अथक परिश्रम घेतले.