
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे खरीप हंगामपुर्व आढावा सभा तथा पाणी टंचाई आढावा सभा पालकमंत्री सुनीलजी केदार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार रामदासजी तडस,आमदार समीरभाऊ कुणावार, आमदार दादाराव केचे, आमदार रणजीतदादा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .सदर बैठकीमध्ये विभागनिहाय आढावा घेण्यात आला असून सभेत ठरल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
