

पोंभुर्णा वार्ताहर
आज जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने स्व. श्री गणपतराव धोडरे महाराज यांचे शेतातील घरी स्नेहमीलन सोहळा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात परिवारातील सर्व बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गोपीनाथजी टिकले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री बारसागडे सर, श्रीमती पार्वताबाई बुरांडे, श्री रविंद्र टिकले, श्री राहुलजी नैताम हे होते.या कार्यक्रमाचे अंतर्गत सौ. कमलबाई व श्री देवरावजी सोमनकर यांचे विवाहाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती विमलबाई गव्हारे, श्रीमती छायाबाई वैरागडे याचा सत्कार करण्यात आला.आज संयुक्त कुटुंब पद्धती टिकवून ठेवणे काळाची गरज असून आजचे सत्कारमूर्ती सौ कमलबाई व श्री देवरावजी सोमनकर यांनी अद्यापही संयुक्त कुटुंबपद्धती टिकवून ठेवली आहे ते त्यांचे कार्य नक्कीच अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन श्री बारसागडे सर यांनी केले. ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळेस श्री योगेशराव धोडरे, श्री दिवाकरराव पिपरे, श्री चंद्रकांत जुवारे, श्री सुशीलराव गव्हारे, सौ. गायत्री बोबाटे यांनी मनोगत व्यक्त केले. तर सौ. सुनीता दुधबळे, सौ. गीता ढोंगे यांनी कौटुंबिक गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रामकृष्णजी गव्हारे यांनी तर आभार श्री. संदीपराव गव्हारे यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश धोडरे,रामकृष्ण गव्हारे,राजु धोडरे,सुमीत धोडरे यांनी परीश्रम घेतले
