
पोंभूर्णा तालुक्यातील कसरगठ्ठा येथील रोहित हनुमंत पिपरे वय १९ वर्ष या यूवकाने आज सांय. ५ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे मुळ कारण अजुन समजले नसून पोंभूर्णा पोलीस घटणास्थळी दाखल झाले आहेत रोहित हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता घरचा कुलदिपक असा निघुन गेल्याने पिपरे परीवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे रोहितने असे टोकाचे निर्णय का घेतले हे समझले नसले तरी रोहितच्या अचानक जान्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमीक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे पाठविले असून सदर घटनेचा तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत
