धक्कादायक: शॉट सर्कीट मुळे तणीस भरलेल्या वाहनाने घेतला पेट, वाहन चालकाच्या समय सुचकतेने जीवीत हानी टळली.

प्रतिनिधी:आशिष नैताम

पोंभूर्णा, देवाडा खुर्द येथे तणीस भरलेल्या वाहनाला शार्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत चार चाकी बोलेरो पिक अप जळुन खाक झाली मात्र सुदैवाने जीवित हानी टळली देवाडा खुर्द येथे गावातच संध्याकाळच्या सुमारास तनीस भरलेल्या बोलेरा पिक अप गाडीने अचानक पेट घेतला हि बाब वाहनचालकाच्या निदर्शनास येता त्याने हिम्मत दाखवत सदर वाहन गावाबाहेर नेऊन उभी केली त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अग्नीशामक गाडी ने आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत गाडी जळुन राख झाली सदर गाडी कवडु मारमोल्लीवार रामपूर दिक्षित यांचे मालकीची असून घटनेचा पूढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत