राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225).
चारचाकी वाहन पुलात कोसळल्याने गांजाची तस्करी उघड झाली. या घटनेत एकजण जखमी झाला असून घटनास्थळावरून ६५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास कळंब- राळेगाव •मार्गावरील कात्री गावाजवळ घडली.
टी.एस.०८/एचके-४६५२ या क्रमांकाचे वाहन पुलावरून कोसळले. या घटनेमध्ये अब्दुल सुफियान (२४ रा. अमरावती) हा जखमी झाला. तो या वाहनात एकटाच होता. राळेगाववरून कळंब मार्गे अमरावतीकडे हे वाहन जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनास्थळावरून ६५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे; परंतु गांजा कुठून आणला ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.
कळंब- राळेगाव मार्गावर वाहने प्रचंड वेगाने हाकली जातात. या प्रकारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होत आहे. हाच प्रकार सदर वाहनाच्या बाबतीतही झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेची कळंब पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे याकडे कर्तव्यदक्ष भुजबळ साहेब लक्ष देतील का ? राळेगाव तालुक्यातील जनतेचा सवाल.
