
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जाहीर पाठींबा देत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे कार्यकर्ते राहणार उपस्थित
वाशिम – प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत दिव्यांग, विधवा, परितक्त्या महिलांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी वारंवार दिलेल्या निवेदनांचा प्रशासनाने विचार न केल्यामुळे येत्या सोमवार, २३ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात ९ मे रोजी दिलेल्या निवेदनाव्दारे मोर्चाचा इशारा देण्यात आला होता. मोर्चाची सुरुवात मनसेच्या अकोला नाका स्थित राजगर्जना कार्यालया येथून सरू होईल. दरम्यान या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने दिव्यांग, विधवा, परितक्त्या महिला व नागरीकांसह मनसेच्या मोर्चा मध्ये रा अ वि महासंघाने पाठींबा देत जिल्हयातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष केशव गरकळ वाशीम ता अध्यक्ष मोहन कोल्हे मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिनेश गायकवाड़, शेतकरी जिल्हाउपाध्यक्ष मनोज राउत, रिसोड तालुकाध्यक्ष दीपक वाघ, मालेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी ,मनसे वाहतूक चिटणीस शंकर घोड़े,मनसे शेतकरी तालुकाध्यक्ष गजानन कुटे शेतकरी वाशिम तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे,रिसोड शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष वैभव वानखेड़े रिसोड मनवीसे तालुकाध्यक्ष ऋषिकेश ठाकुर,वाशिम मनविसे तालुकाध्यक्ष यश चव्हाण मालेगाव शहरध्यक्ष विकी वर्मा, रिसोड शहराध्यक्ष संजय येवले,शहरउपाध्यक्ष अमोल तुरेराव,म.नाथ शेतकरी सेना शहराध्यक्ष सुनील वानखेड़े
वाहतूक सेनेचे विजय जाधव वाहतूक सेनेचे विनोद सावके,वाहतूक सेनेचे दत्ता जावळे,आकाश खाड़े
तालुका उपाध्यक्ष विठ्ठल राठोड, शहराध्यक्ष कृष्णा इंगळे, शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले,महाराष्ट्र सैनिक रवि राउत, सतेंद्र बंदिवान, मनवीसे चे रवि मुळतकर महिला सेनेच्या संगीता चव्हाण, सिता धंदरे, सौ. वंदना अक्कर, स्मिता जोशी, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या राज्य संचालीका बालीका होलगरे, जिल्हाध्यक्षा सौ. बेबी धुळधुळे, विदर्भ अध्यक्ष गोपाल मोटे , जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातव, जिल्हाध्यक्ष परसराम दंडे, राधेश्याम जाधव, रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ जाधव, रिसोड ता अध्यक्ष धनीराम बाजड मालेगाव ता अध्यक्ष संतोष आबेकर मंगरूळनाथ ता अध्यक्ष संजय अबलकर मानोरा ता अध्यक्ष गुलाब मनवर,कारंजा ता अध्यक्ष ब्रम्हदेव बाडे वाशीम शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे,सुनील अवगण,गजुभाऊ जेताड़े,महेश देशपांडे,गजानन बर्डे, देवा खरे,महेश कदम, कार्यलय प्रमुख प्रकाश कवडे, शंकर राऊत,प्रवीण जाधव,कुणाल तायड़े,सतिष कड़वे, मनिष महल्ले, संतोष पवार, गणेश केदार,तुषार राउत,विट्ठल मुठाळ आदींनी केले आहे.
