
आज.२२.५.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील ग्राम.पंचायत बोडधा येथे ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी जिल्हा परिषदेच्या निधीतून नवीन ग्राम पंचायत भवन व नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी निधी दिली त्या कामाचे भूमिपूजन आज डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या उपस्थित संपन्न झाले
चिमूर तालुक्यातील बोडधा येथिल ग्राम पंचायत इमारत व अंगणवाडी इमारत ही मोडकडीस आली होती ग्राम पंचायत सरपंच व संपूर्ण कमिटीनी ही बाब जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष वाट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांना माहिती दिली सतिशभाऊ वारजूकर यांनी स्वतः बोडधा येथे जाऊन पाहणी केली व जिल्हा परिषदेचे निधीतून हे दोन्ही काम मंजूर करून केले व आज भूमीजन करण्यात आले या वेळी ,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी कार्याअध्यक्ष विजयजी गावंडे, चिमूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष रोषणभाऊ ढोक,ग्राम पंचायत सरपंच सौ.रोशनीताई बारसागडे, ग्राम पंचायत उपसरपंच सदाशिवजी घोणमोडे,ग्राम पंचायत सदस्य प्रकाश घोनमोडे,ग्राम पंचायत सदस्य लताताई मेश्राम, माजी सरपंच प्रभाकरभाऊ मेश्राम, रोजगार सेवक देविदासजी दहिवले,शामरावजी घोणमोडे,प्रमोदजी सहारे,हिवराज देहूळकर,दिघांबर बारसागडे,गुलाबाजी बारसागडे,रवी मेश्राम, मुरलीधरजी रकतसिंगे,व गावकरी उपस्थित होते
