
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक २९/५/२०२२ रोजी येवती येथे झालेल्या ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत,’ शेतकरी विकास पॅनल च्या सर्व १३ पैकी १३ ही उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला, विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून, प्रफुल मधुकर कुरटकर, प्रफुल बबनराव येंगडे, पंकज मधुकर गावंडे, श्याम वसंतराव कुरटकर, वसंतराव अभिमानजी वाघ, प्रमोद कृष्णाजी ठाकरे, पुरुषोत्तम रामाजी भोयर, मंगेश यादवराव पारधी तसेच महिला प्रवर्गातून भारती मनोज राऊत, सिंधू नामदेव जिखार, इतर मागास प्रवर्गातील सागर राजेंद्रजी वाघ, अनुसूचित जाती/जमाती मधून श्रीराम कोंडबा सोयाम व विमुक्त भटक्या जमाती मधे आनंदराव लक्ष्मणराव चौधरी हे विजयी झाले असून विरोधी’ जय किसान पॅनल चा धुव्वा उडवत विजय साजरा करण्यात आला. सर्व निवडणूक प्रक्रियेत उपसरपंच आशिष कृष्णराव पारधी, राजू कृष्णाजी ठाकरे, सुधाकरराव वाघ, रामदासजी गावंडे, विनायक झोटिंग यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
