
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वृद्धाश्रम बोर्डा,वरोरा येथे साजरी करण्यात आली.
जुबेर शेख
यळकोट यळकोट जय मल्हार जय घोषात वरोरा शहरात फेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे Dr.प्रभाकर लोंढे Dr.प्रफूल खुजे, प्राचार्य गजानन शेळकी, Dr. सरवदे,समाजसेवक चिडे सर Ad. उज्वला चिडे, संचालिका सोनुताई येवेले, अधसेविका बरडे मॅडम, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे मार्गदर्शक संजय बोधे व सूत्र संचालन गणेश चिडे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन आशिष शेळकी यांनी केले.
Dr प्रभाकर लोंढे सर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सांगितला.
त्यावेळी समस्त अहिल्याभक्त, शिवभक्त वरोरा येथील जनता उपस्थित होती.
तसेच अहिल्यादेवी जयंती ला सहकार्य अजिंक्य काळे, शिरीष उगे, भूषण झिले, संदीप चिडे, अक्षय झिले, अमोल चिडे, आशिष झाडे, सचिन चिडे, प्रणाल थाटे, योगीराज चामाटे,पांडुरंग गावंडे, सुखदेव कवलकर, अजिंक्य चिडे,पायल बोधे , प्रज्ञा काळे, पल्लवी येवले, पल्लवी बोधे तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उस्तव समिती वरोरा चे समस्त पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.
त्यावेळी राजमाता पुण्यश्लोक वृद्धाश्रमाला संजय बोधे सर कडून देणगी स्वरूपात 5000 चा चेक व उस्तव समिती कडून 3000 रुपये देणगी देण्यात आली.तसेच मुरलीधर शेळकी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा वृद्धाश्रमाला भेट करण्यात आली.
त्यावेळी सोनुताई येवले यांनी देणगी धारकांचे आभार व्यक्त केले.
