शार्ट सर्किट मुळे डाळिंबाची बाग जळून खाक,पंधरा एकर मधील पाच हजार चारशे डाळिंबाची झाडे जळून खाक

एक कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न बुडालं

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

२९ मे २०२२ च्या रात्री वादळी वारे वाहत असताना शार्ट सर्किट होऊन डाळिंबाची अख्खी बाग जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना राळेगांव तालुक्यातील टाकळी(झोटींग) येथे घडली आहे.
मनिष यशवंतराव झोटींग या शेतकऱ्याची पंधरा एकर शेतजमिनीतील डाळिंबाची पाच हजार चारशे झाडे जळून खाक झाल्याने दरवर्षी जवळपास एक कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न बुडालं आहे. सात वर्षाची ही डाळिंबाची बाग उत्पन्न द्यायच्या आत वीज वितरण कंपनी च्या दुर्लक्षित धोरणा मुळे शार्ट सर्किट होऊन जळाल्याची तक्रार प्रशासना कडे केली असून महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यां नी स्थळ पंचनामे केले आहे परंतु वीज वितरण कंपनी कडे तक्रार देऊन ही कोणीच आले नाही ही शोकांतिका च नाही का?…
सात वर्षा पासून मनिष झोटींग या तरुण शेतकऱ्याने खूप आर्थिक,मानसिक त्रास सहन करत ही डाळिंबाची बाग फुलविली पण शार्ट सर्किट होऊन “एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं “…सोबतच ओलीत साहित्य ड्रीप संचा सह शेतीपयोगी साहित्य आगीत भस्मसात झालं आहे.
डाळिंबाची बाग भरघोस उत्पन्न देईल आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल ही स्वप्ने चं आता उरली आहे.
प्रशासनाने सर्व व्यवस्थित स्थळ पंचनामे करुन जास्तीत जास्त आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मनिष झोटींग या तरुण शेतकऱ्याची आहे.