
शारीरिक सुदृढता असेल तरच समृद्धी येईल – प्रा.डॉ.तेजसिंग जगदळे
जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा ग्रेट भेट उपक्रम
‘आरोग्य : तंत्र व मंत्र’ विषयावर प्रबोधन
काटोल – सुदृढ शरीर ही संपत्ती आहे.चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम व योगासन महत्त्वाचे आहे.शारीरिक सुदृढता असेल तरच जीवनात समृद्धी येईल अन्यथा ‘रुग्ण’ म्हणून जीवन व्यथित करावे लागेल असे प्रतिपादन नबिरा महाविद्यालय, काटोलचे क्रिडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.तेजसिंग जगदळे यांनी जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे ‘ग्रेट भेट’ उपक्रमातंर्गत ‘आरोग्य : तंत्र व मंत्र’ या विषयावरील व्याख्यान दरम्यान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के , मार्गदर्शक म्हणून नबीरा महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख डॉ.प्रा.तेजसिंग जगदळे, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस कराटे प्रशिक्षक मुकेश ठाकरे, केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे डॉ.तेजसिंग जगदळे म्हणाले, जीवनात आरोग्याला महत्त्व दिल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते.आरोग्यासाठी कमीत कमी एक तास दररोज दया म्हणजे आरोग्याची श्रीमंती प्राप्त कराल.सकारात्म ऊर्जा मिळवून जीवनात यशस्वी व्हाल.
यावेळी स्वयंसिद्धा कराटे प्रशिक्षणाचे प्रशिक्षक पोलीस कराटे प्रशिक्षक मुकेश अशोक ठाकरे, राष्ट्रीय खेळाडू डिंपल मुकेश ठाकरे, राष्ट्रीय खेळाडू प्रज्वल रवींद्र टेकाम, राष्ट्रीय खेळाडू प्रतिक गौतम चिचखेडे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के , संचालन चैतन्य पवार तर आभार प्रदर्शन स्वर्णा कोटजावळे यांनी केले.
