राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील झरगड येथे तीघांनी संगणमत करुन एकास जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी ( ता .१३ ) रोजी घडली . रोशन दादाराव आत्राम व अजय डोमाजी आत्राम यां दोघांचेही शेत झरगड परिसरात आहे . अजय आत्राम यांचे शेत गट क्र . ८० क्षेत्र हे ०२ आरमधील वहिवाटीचा रस्ता न्यायालयाने पोलिस प्रशासनासमोर जेसीबी द्वारे मोकळा करुन दिला असतानाही रोशन आत्राम यांच्यासह अन्य दोघांनी अजय आत्राम यांचा रस्ता अडवून या रस्त्यावरून जाणे येणे करायचे नाही , असे म्हणत मारहाण केली . अजय आत्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
