
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या येवती ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक १६ जुन रोजी घेण्यात आली असता बिनविरोध एक मताने सोसायटीच्या अध्यक्षपदी पंकज मधुकरराव गावंडे तर उपाध्यक्षपदी प्रफुल मधुकरराव कुरटकर यांची निवडणूक अधिकारी पहुरकर साहेब यांनी करण्यात आली आहे
ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सर्व संचालक मंडळानी निवडणुकीत,शेतकरी विकास पॅनल च्या सर्व १३ पैकी १३ ही उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला संचालक , प्रफुल बबनराव येंगडे श्याम वसंतराव कुरटकर, वसंतराव अभिमानजी वाघ, प्रमोद कृष्णाजी ठाकरे, पुरुषोत्तम रामाजी भोयर, मंगेश यादवराव पारधी भारती मनोज राऊत, सिंधू नामदेव जिखार, सागर राजेंद्रजी वाघ श्रीराम कोंडबा सोयाम आनंदराव लक्ष्मणराव चौधरी यांनी अध्यक्षाची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याने गावात आंनदाचे वातावरण निर्माण झाले होते सर्व निवडणूक प्रक्रियेत उपसरपंच आशिष कृष्णराव पारधी यांनी निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळेस, राजू कृष्णाजी ठाकरे,राम कुरटकर सुधाकरराव वाघ,रामदासजी गावंडे, विनायक झोटिंग उपस्थित होते.
