गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोक चळवळ उभी केली पाहिजे – मधुसूदन कोवे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (952925625)

राळेगाव तालुक्यातील चोंदी ग्राम येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे गुरुजी उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती मा.हरीदास आडे अध्यक्ष बिरसा मुंडा उत्सव समिती चोंदी ग्राम विष्णू ऊइके आणि सौ.शितल सिडाम मा.रमेश कोवे पोलिस पाटील उपस्थित होते.

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी चळवळीचा मुख्य हेतू गुलामगिरी च्या विरुद्ध आवाज उठवुन उलगुलान निर्माण करण्यासाठी होता आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारून देशातील स्वातंत्र्य सैनिक मधिल एक तरुण क्रांतिकारी योध्दा होता. ही गुलामगिरी च्या विरोधात असलेली स्वराज्याची लोक चळवळ होती.

आता गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोक चळवळ उभी केली पाहिजे आपले हक्क आणि अधिकार आपण समजून घेतले पाहिजे गावात स्वराज्य निर्माण करण्यासाठी ग्राम सभा ही दुधारी तलवार आहे लोक प्रतिनिधीला प्रश्न विचारुन ग्राम विकासाच्या दृष्टीने आपण ठराव मांडले पाहिजे असे मत मार्गदर्शन करताना मा.मधुसुदन कोवे गुरुजी यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक चंद्रबोधी घायवाटे यांनी केले कार्यक्रमात सहभागी ग्रामवासी दत्ता पेंदोर अनिल चांदेकर कुंदन पेंदोर विष्णू ऊइके नितीन ठाकरे देवा मडावी सिडाम साहेब लोणी गावातील ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या कार्यक्रम चे आभार कुंदन पेंदोर यांनी मानले.