वेडशी सोसायटी अध्यक्षपदी बबनराव उताणे उपाध्यक्ष पदी उत्तम दोडके यांची निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

नुकत्याच पार पडलेल्या वेडशी येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काँगेस पक्षाचे अंकुशभाऊ मुनेश्वर गटाचे संचालक सदस्य विजयी झाले आणि काल झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी बबनराव उताणे तर उपाध्यक्षपदी उत्तम दोडके यांची निवड करण्यात आली. या निवडीने बेडशी गावात आनंदाचे वातावरण असून नवनिर्वाचीत पदाधिकारी व संचालकांचे गावकऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.