
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
5 फेब्रुवारी रोजी राळेगाव येथील मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण देशामध्ये 75 कोटी सूर्यनमस्कार सर्व शाळांमधून घेण्याचे ठरले त्याचाच एक भाग म्हणजे वरील शाळेमध्ये सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले .यामध्ये शाळेच्या 136 विद्यार्थ्याने सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूपेंद्र कारीया यांनी केले व अभाविप चे कार्यकर्ते लक्ष्मण ढुमणे, अर्जुन वर्मा तसेच ऑनलाईन उपस्थितीत अभाविप नगरमंत्री अंकित तीवाडे, नगरसहमंत्री हर्ष वानखडे तर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी अग्रेसर म्हणून सुरज गुजरकर , भिकमचंद वर्मा यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष कडू सर यांनी केले शाळेच्या शिक्षिका इंदिरा मॅडम यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
