किसान गोष्टी कार्यक्रम व कृषि दिन कार्यक्रम संपन्न


प्रतिनिधी: जुबेर शेख,वरोरा


आज दि. १ जुलै २०२२ रोजी टेमुर्डा येथे तालुका कृषि अधिकारी, वरोरा अधिनस्त मंडळ कृषि अधिकारी टेमुर्डा व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम व कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रतिभाताई धानोरकर, आमदार वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्र यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. सुचिताताई ठाकरे, सरपंच टेमुर्डा यांनी भूषविले.
कृषि विभागामार्फत शेतऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रसंगी मा. आमदार महोदया यांनी केले तसेच कृषि विभागाच्या कार्याबद्दल गौरोवोद्गार काढले व समाधान व्यक्त केले. आनंद निकेतन कृषि महाविद्यालयाचे श्री महाजन सर यांनी कापूस व सोयाबिन पिकांचे व्यवस्थापन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच डॉ. नेहारे मॅडम यांची सर्व पिकावरील किडीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाकरिता मा. गोडशेलवार, संवर्ग विकास अधिकारी वरोरा, मा.गजानन भोयर , तालुका कृषि अधिकारी वरोरा, ग्राम पंचायत चे सर्व पदाधिकारी, परिसरातील सरपंच, शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी, कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री धात्रक साहेब, कृषि अधिकारी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कु. प्रगती चव्हाण, मंडळ कृषि अधिकारी, टेमुर्डा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मंडळ टेमुर्डा तसेच तालुका कृषि अधिकारी वरोरा अधिनस्त सर्व मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व सर्व कृषि कृषि सहाय्यक व BTM व ATM यांनी परिश्रम घेतले.