
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
समाजाला देणे हे पहिले पासूनच येरावार कुटुंबाला चागल्या प्रकारे माहिती आहे आर्यन आणि वेदान्त यांनी सुद्धा आपल्या कर्तृत्वामधून दाखविले आहे आर्यन व वेदांत यांची आजी मंदाताई येरावार ह्या सुद्धा समाजसेवेमध्येअगदी तत्पर असतात ढाणकी गावात कोणत्याही धर्माच्या आध्यातमीक कार्यक्रम असो नेहमीच सढळ हातानेच मदत करतात आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत अरुण येरावार व मंदाताई येरावार यांच्या
ना तानी सुद्धा हे काम अविरत चालू ठेवणार असे संकेत आर्यन आणि वेदांत याचे रूपाने बघावयास मिळत आहे आर्यन व वेदांत हे परराज्यात अगदी कोसोदूर शिकायला असताना आपल्याला समाजाप्रती काही देणे लागते या उदात्त हेतूने त्यांनी ढाणकी शहरातील गोरगरीब महिलांना व मुलीना सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ स्वाती मुनेश्वर डॉ आनंद जाधव डी एंल राठोड एस एम रावते एस एस वाघाडे संजय रानवा आणि आशा वर्कर यांच्या उपस्थितीत महिलांना सैनिटरी नेपकिन वाटप केले ढाणकी शहरातील सर्व महाविद्यालयात आणि शाळेत सुद्धा सैनिटरी नेपकिन वाटप केले त्यांना या सामाजिक उपक्रमात त्यांचे वडील अनिल येरावार आणि काका नितीन येरावार यांनी सहकार्य केले यास अनुसरून जनजागृती केल्यामुळे अनेक मान्यवरांनी येरावार कुटुंबाचे अभिनंदन केले.
