आम आदमी पार्टी ॲक्शन मोडवर; यवतमाळ, राळेगाव पक्ष विस्तार करणार; राळेगाव तालुका अध्यक्ष आशिष भोयर (पाटील)

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

दि. ४ (सोमवार) रोजी आम आदमी पार्टी राळेगाव तालुका यांच्या वतीने वेडशी येथे आम आदमी पार्टी शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा अध्यक्ष वसंतराव ढोके व जिल्हा सचिव ॲड मनिष माहुलकर तसेच प्रमुख पाहुणे तालुका संयोजक आशिष भोयर व सहसंयोजक गौतम तांगडे, तालुका संघटक मंत्री सुभाष मडावी, तालुका सचिव संदीप तामगाडगे, जळका सर्कल प्रमुख सुभाष येलेकार यांनी केजरीवाल सरकार व पंजाब सरकार जनतेचे कार्य कशाप्रकारे करते त्या पद्धतीने पाणी, विज, शाळा, आरोग्य अशा मुलभूत सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजे. त्या बद्दल राळेगाव तालुका अध्यक्ष आशिष भोयर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.
वेडशी शाखा प्रमुख विशाल कोटरंगे, सहप्रमुख प्रफुल्ल शेलोटे, सचिव रियाज शेख व सदस्य सुभाष आत्राम, प्रकाश मस्कर, धीरज कुमरे, राजु पेटकुळे, रामु घोडे, मनोहर चौधरी आदी वेडशी ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते.