पावसामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान, राळेगाव शहरातील मुद्रांक विक्राते व इतर व्यावसायिक हवालदील

8

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव शहरात झालेल्या ढग फुटी मुळे नाही तर सहज आलेल्या पावसाने शहरातील व्यावसायिकांना नेहमी खूप मोठा फटाका पडते कारण पूर्वी राळेगाव येथे ग्रामपंचायत असल्याने संपूर्ण शहरात व तेथील व्यावसायिकाच्या दुकानात पाण्याचा खूप मोठा नैसर्गिक आपत्तीमुळे पाणीसाठा होत होता ना विलाजाने त्यांना तेथील व्यावसायिकांना स्वतःहून आपला नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या पाण्याचा पुरवठा हा बाहेर काढावा लागते तसेच आज रोजी सर्वात महत्त्वाचे तहसील कार्यालय राळेगाव येथील सामोर असलेले मुद्रांक विक्रेते सुभाष चौधरी यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे एक लॅपटॉप, पी सी व झेरॉक्स मशीन झालेल्या अती वृष्टी मुळे नुकसान झाले. व्यावसायिक जनतेची मदत करीत असून स्वतःहून घेतलेल्या गाळ्यामध्ये पाण्याचा खूप मोठा भरमसाठ प्रवाह होत आहे, परंतु नगरपंचायत च्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांच्यावर कोणती उपाय योजना करण्यात येत नाही, एक मुद्रांक विक्रेत्यांची नाही तर संपूर्ण राळेगाव शहरातील व्यावसायिक विविध प्रकारचे भाजी मंडी, मोटर रिवायडींग, कृषी केंद्र, व टेशनारी व्यावसायिक यांना झालेल्या नैसर्गिक आपत्ती नुसार पाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानात साठल्या जात आहे, ते काढण्यासाठी व बाहेर निघण्यासाठी किमान पाच ते सहा तास लागत आहे,हे आज रोजी नसून गेल्या खूप वर्षा पासून सुरू आहे परंतु या कडे कोणाचेही लक्ष केंद्रित नाही, त्यामुळे व्यावसायिकांना स्वतःहून मशीन लावून आपल्या दुकानातील पाणी बाहेर काढावे लागते परंतु राळेगाव नगरपंचायत यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे स्वतःहून व्यावसायिकांना आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी हा प्रयोग करावा लागतो याकडे नगरपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असे निदर्शनात येत आहे, परंतु राळेगाव शहरात होत असलेल्या या प्रकोपाला आज रोजी नगरपंचायत राळेगाव यांनी लक्ष केंद्रित करून मुद्रांक विक्रेते तसेच इतर व्यावसायिक यांना दिलासा देण्याचे काम करावे अशी जनतेतून आहार्त हाक होत आहे.