पहापळ येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा, 23 हजार रुपयांचा माल नष्ट

प्रतिनिधी:सुमित चाटाळे

केळापुर तालुक्यातील पहापळ येथे पांढरकवडा पोलिस द्वारे मंगळवार दि. 4 मे रोजी अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 23 हजार रुपयांचे दारू व रसायन नष्ट केले आहे.

केळापुर तालुक्यातील पहापळ येथे अवैध गावठी दारू निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहतीनुसार पांढरकवडा पोलीस स्टेशन चे पहापळ बीटचे जमादार श्री. मारोती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहापळ ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी सोबत मिळून मंगळवारी सकाळी अचानक छापा मारला. या छाप्यात 23,000 रुपये किमतीचे दारू व रसायन नष्ट केले.

पहापळ येथील ग्रामपंचायत परिसरातील मागील बाजूस गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पांढरकवडा पोलिस येथील सकाळच्या दरम्यान छापा टाकला 210 किलो सडका मोह अंदाजे किंमत 21,000 रू. व 10 लिटर गावठी दारू अंदाजे किंमत 2,000 रू. असून सदर घटनेप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पांढरकवडा पोलिस स्टेशन चे कर्मचारी श्री. मारोती पाटील यांनी दिली.