BREAKING NEWS: नर्मदा नदीत बस कोसळली, १३ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या इंदौरमधून पुण्याला येणाऱ्या बसला मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव इथे मोठी दुर्घटना घडली आहे. ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.