अल्टिमेट खो-खो लीग स्पर्धेत विदर्भ क्रीडा मंडळ काटोलचे दोन खेळाडू खेळणार

14 ऑगस्ट 6 सप्टेंबर या कालावधीत शिवछत्रपती व स्टेडियम पुणे येथे होणाऱ्या अल्टिमेट खो-खो लीग (लाईव्ह स्पोर्ट सोनी टीव्ही) या स्पर्धेत विदर्भ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ काटोल चे खेळाडू कॅटेगिरी ए मध्ये दिलराजसिंग रेखा सिंगर राजस्थान वॉरिअर्स व कॅटेगिरी सी मध्ये शुभम मारोतराव जांभळे गुजरात जायटन्स संघात निवड झाली आहे.
दिलराज सेंगर हा वन विभागात कार्यरत आहे तसेच शुभम जांभळे सिटी पोलीस नागपूर येथे कार्यरत आहे
दिलराज सेंगर व शुभम जांभळे हे दोघेही खो खो फेडरेशन ऑफ इंडिया व खो खो अल्टिमेट द्वारे संपूर्ण भारतातून 2022 दिल्ली येथील राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरास त्यांनी दाखविलेल्या कामगिरीची दखल घेत त्याची निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी दिलराजसिंग रेखा सेंगर साफ गेम्स भोपाळ रेस्ट ऑफ इंडिया गुहाटी एशियन चॅम्पियन शिप राजस्थान2017 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड खो खो टेस्ट सिरीज अजमेर राजस्थान येथे भारताचे प्रतिनिधित्व केले तसेच शुभम जांभळे याने भारत विरुद्ध नेपाळ खो खो टेस्ट सिरीज इंदूर येथे भारताचे प्रतिनिधित्व केले व ऑल इंडिया 2017 कोल्हापूर इचलकरंजी चार वेळा नॅशनल चॅम्पियन शिप विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले
दिलराजसिंग रेखा सेंगर व शुभम जांभळे हे विदर्भ क्रीडा मंडळ काटोल चे
खेळाडू असूनअप्रतिम यशाचे श्रेय माजी मा.श्रीमती.वैशालीताई ठाकुर नगराध्यक्षा
मा.चरणसिंग ठाकूर गट नेते प्रा सुधीर निंबाळकर सचिव विदर्भ खो -खो असोसिएशन प्रा. सुहास पांडे अध्यक्ष विदर्भ खो खो असोसिएशन प्रा.डॉ.राजश्री सोनारे अध्यक्ष विदर्भ क्रीडा मंडळ प्रा.भास्कर लुंगे बंडू रिधोरकर कोषाध्यक्ष ,सचिव प्रमोद कोहळे,मारोती मुरके स्वल्पविराम चित्रपट चे लेखक. डॉ. प्रकाश वैद्य, शेषराव रेवतकर,नाना ढोबळे, गणेश धुळे,मंगेश शिरपूरकर, निलेश तवले, अमित तांबे,सचिन जांभळे,कुणाल वाईकर व विदर्भ क्रीडा मंडळ इतर सदस्य व ज्येष्ठ खेळाडू यांनी शुभम जांभळे व दिलराज सेंगर यांचे अभिनंदन केले.