
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्रा मध्ये एकनाथजी शिंदे व देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्या नंतर त्यांनी अनेक कांतीकारी लोकोपयोगी निर्णयाचा धडाका सुरू केला असुन दि. १४/०७/२०२२ रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना रू. ५०,००० /- अनुदानाचा निर्णय घेण्यात आला, त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व नगरपरीषद, नगरपंचायती मध्ये अमृत योजना लागू करण्यात आली. त्यामुळे आता राळेगांव शहरात अमृत योजने अंतर्गत नविण पाणी पुरवठा योजना व सांडपाणी गटाराचा अद्ययावत यंत्रणा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सोबतच महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ या कायद्यात सुधारणा करून कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकी मध्ये थेट मतदानाचा शेतक-यांना अधिकार बहाल करण्यात आल्या बद्दल सर्व सामान्य शेतक – या तून या निर्णयाचे प्रचंड स्वागत करण्यात येत आहे. त्याकरीता महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्याचा ठराव भारतीय जनता पार्टी राळेगांव तालुक्याच्या बैठकीत पारीत करण्यात आला. याप्रसंगी भा.ज.पा. चे जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रफुल्लसिंह चौहान यांनी मार्गदर्शन केले व वरील निर्णय हा कांतीकारी असुन त्यामुळे सहकार क्षेत्रावरील एका पक्षाची, गटाची मक्तदारी मोडीत निघणार असुन आता यापुढे सर्वसामान्य शेतक-यांना ख-या अर्थाने त्यांचा पतिनिधी निवडून पाठविता येईल असे विचार व्यक्त केले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी श्री चिंतरंजन कोल्हे हजर होते तर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत तायडे, शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर, ता. सरचिटणीस अभिजीत कदम, माजी नगराध्यक्ष बबन भोंगारे, विशाल पंढरपुरे, शारदानंद जयस्वाल, विनायक महाजन, शुभम मुके यांचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
