पंढरपूर येथील गुरुकृपा दुध डेअरी वर कारवाई करा -याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

पंढरपूर येथील गुरुकृपा दूध डेअरी वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाई नितीन काळे यांनी प्रांताधिकारी पंढरपूर यांना केली. पंढरपूर शेगाव दुमाला येथील वारकरी शिक्षण संस्थेतील 40 विद्यार्थ्यांना दोन दिवसा पुर्वी विषबाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही गंभीर बाब घडुन देखील अन्न व भेसळ विभागाने संबंधित दुध डेअरीवर कोणतीही अद्याप कार्यवाही केलेली नाही . करिता सदर प्रकरणातील डेअरी मालकावर कायदेशीर कारवाई करून अहवाल प्राप्त होई पर्यंत डेअरी सील करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा समाजसेवक नितीन काळे यांनी दिला आहे . याबाबत आज जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित जनहीतचे महेश बिस्किटे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.