माणुसकीचा धर्म जागणाऱ्या रूग्ण सेवक रितेश भरूट यांचा अनेक चाहत्यांनी केला वाढदिवसानिमित्त सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व तथा युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस तथा समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले, जिथे गोरगरीबाचा हात पोहचत नाही अशा आरोग्याच्या सेवेसाठी सदैव वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ परिसरात रूग्णांना मदत करण्यासाठी तत्पर असणारे, रूग्ग संपूर्ण बरा होईपर्यंत त्याची जातीने विचारपूस करणारे,हे सगळे कार्य करत असतांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सेवेत हातभार लावणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ.प्राची रितेश भरूट, भोयर असे , हे गोरगरीब, सामान्य लोकांना मदत करणारे,कोरोना सारख्या महामारीत स्वताची जिवाची पर्वा न करणारं हे जोडपे, यापैकी आज दिनांक 21/7/2022 रोजी रितेश भाऊ भरूट यांचा वाढदिवस त्यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.त्यावेळी दिवसभरात यवतमाळ जिल्हा तथा बाहेर जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांचा सत्कार सुद्धा केला.त्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तथा यवतमाळ येथील काॅंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेते तथा युवा कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला.त्यावेळी अनेक मान्यवर मंडळींनी दिलेल्या शुभेच्छानी आपण भारावून गेलो असल्याचे सांगितले व माझ्यावर प्रेम करणारी मंडळी हीच माझी खरी संपत्ती असल्याचे त्यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले.