
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांना राजकीय सूडबुद्धीने लक्ष करून केंद्र शासनाकडून ईडी कार्यालया द्वारे नोटीस बजावून चौकशी चा ससेमिरा पाठीमागे लावून नाहक त्रास दिल्या जात आहे,
केंद्र शासनाच्या या हुकूमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता, संविधान निर्माते, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ सर्व कॉग्रेस नेते, पदाधिकारी, सर्व सहकारी संस्था पदाधिकारी, संचालकआणि कॉग्रेस कार्यकर्ता यांनी एकत्र येऊन “शांततापूर्ण सत्याग्रह“करायचा आहे.
राळेगाव शहर कॉग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीपभाऊ न. ठुने यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना हजर राहावे अशी विनंती केली आहे.