भद्रावती तालुक्यातील चारगाव क्षेत्रात वाघांची संख्या वाढली इतर वन्य जनावरांचा ही उपद्रव,उपायोजना करण्यासाठी चारगाव ग्रामपंचायतचे वन विभागाला निवेदन

माजरी:- भद्रावती तालुक्यातील चारगाव क्षेत्रात वेकोलीच्या बंद पडलेल्या कोळशाच्या खाणीमुळे झाडे व झुडपे वाडून हा परिसर जंगलमय झाला आहे. वाघासह रानडुकरे रोही व इतर जिवांनी आसरा घेतल्यामुळे चारगांव परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे हे वन्यजीव शेतकऱ्यांच्या शेतमालाचा पण मोठ्या प्रमाणे नुकसान करीत आहे. येथील वाघांचा व इतर वन्यजीवांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी नागरिकांकडून वेकोली तसेच विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
विकोलीच्या खाणी बंद पडल्यामुळे येथे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात सर्वत्र जंगल निर्माण झाले आहे. वन्य जनावरांना मुबलक पाणी व शिकारी साठी वन्यप्राणी त्यामुळे येथे वाघांनी वास्तव्य केले आहे. या वाघांची संख्या वाढून ते चार झाले आहे. या वाघांनी तेथील शेतकऱ्यांचे अनेक पाळीव प्राणी मारून शिकार केल्याने शेतकऱ्यांना खूप नुकसान होत आहे. या वाघाचे दर्शन होत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. योजना करण्यासाठी या अगोदर वनविभागाला अनेक निवेदन देण्यात आले मात्र यावर अद्याप उपायोजना करण्यात आली नाही. एखादी अनुचित घटना घडण्याआधी या वाघांचा व इतर जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.