कर्नाटका एम्टा कोल माईन्स प्रशासन व आंदोलकांमध्ये तहसीलदाराच्या मध्यस्थीने भाजयुमोचे युवा नेतेआकाश भाऊ वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

प्रतिनिधी:चैतन्य कोहळे, भद्रावती


दिनांक 13/07/2021 रोजी भाजयुमोचे युवा नेते आकाश भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात कर्नाटका एम्टा कोल माईन्स मध्ये स्थानिकांच्या रोजगाराच्या ज्वलंत प्रश्नांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले होते.
चार तास एम्टा कोल माईन्स चे काम बंद केल्यानंतर तहसीलदार साहेब भद्रावती व पोलीस प्रशासन भद्रावती यांच्या मध्यस्थीने आंदोलनाला स्थगिती देऊन दिनांक 14/07/2021 रोजी तहसील कार्यालय भद्रावती येथे बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीमध्ये वानखेडे यांनी जोपर्यंत लेखी आश्वासन भेटणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा दिला त्यावर तहसीलदार साहेब भद्रावती यांनी कर्नाटक एम्टा कोल माईन्स प्रशासनाला सात दिवसाच्या आत लेखी आश्वासन व तिथे काम करत असलेल्या मजुरांचा तपशील स्थानिक किती व बाहेरील कामगार किती याचा संपूर्ण डाटा तहसील कार्यालयात तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले व आंदोलकांनी सात दिवस स्थगिती द्यावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व तो सर्व निर्णय आंदोलक व प्रशासनाला मान्य होता सर्वानुमते निर्णय झाल्यानंतर वानखेडे यांनी माहिती देताना सांगितले की सात दिवसा नंतर आम्हाला न्याय न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला
तोपर्यंत आंदोलनाला स्थगिती देण्यात आलेली आहे.
या बैठकीमध्ये कर्नाटका एम्टा कोल माईस चे प्रतिनिधी व आंदोलकांतर्फे भाजयुमोचे युवा नेते आकाश भाऊ वानखडे ग्रा. प. कढोली सदस्य ललिता ताई आत्राम ग्रा. प. सदस्य निलेश मेश्राम इंदुताई पावडे प्रतिभा परचाके भाजयुमोचे विस्मय बहादे चैतन्य कोहळे आभास पेटकर राकेश यमलावार गणेश खैरवार