चिखली येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात साचले पाणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

मागील आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पावसाचे पाणी साचल्याने शाळेच्या समोरील भागाला तलावाचे स्वरूप आले आहे. चिखलीची जिल्हा परिषद शाळा ही गावाबाहेर असल्याने व संततधार पाऊस आल्याने शेतातील बांध फुटून शाळेच्या आवारात तसेच किचनशेड मध्ये पाणी शिरले असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यात दोन दिवसात संततधार पावसाने झालेल्या अनेक शासकीय निम शासकीय कार्यालयाचे आवारात तसेच अनेक शाळेच्या आवारातही पाणी साचले आहे . शाळेत लहान मुले मुली आहे जर तसेच हे पाणी साचून राहिले तर लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे.शाळेच्या समोरील आवारात साचलेल्या पाण्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक शिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन साचलेल्या पाण्याचा त्वरित विल्हेवाट लावावी अशी मागणी पालकवर्गानी केली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात शाळेच्या आवारात पाणी येत नव्हते परंतु यावर्षी सतत धार पाऊस सुरू असल्याने बाजूच्या शेतातील बांध फुटून शाळेच्या आवारात भरपूर पाणी साचले आहे या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी व्यवस्थापन समितीची बैठक आज मंगळवार ला घेणार असून पाण्याचा लवकरच विल्हेवाट लावणार असल्याचे सांगितले आहे

 उषाताई थूटे

मुख्याध्यापिका
जिल्हा परिषद शाळा चिखली