

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात ९ जुलै आणि १७, १८ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, शेतातील पिके आणि शेत जमीन खरडून गेली तरी सुद्धा महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मोबदला द्यायला तयार नाही, तसेच केंद्र सरकारने अन्नधान्य सहित रोज आवश्यक असलेल्या वस्तूवर G S T लावून सर्व सामान्य जनतेला वेठीस धरले आहे, गॅस सिलेंडर चे दर सर्व सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेले आहे, पेट्रोल, डिझेल, रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे, या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, शेतकरी, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्यासाठी कॉग्रेस पक्षाच्या वतीने, कॉग्रेस नेते मा. प्रा. श्री. वसंतरावजी पुरके सर आणि यवतमाळ जिल्हा कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.ऍड.श्री. प्रफुल्लभाऊ मानकर, ओबीसी विभागाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. अरविंदभाऊ वाढोनकार यांचे नेतृत्वाखाली उद्या दिनांक ५ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. करिता आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
