


राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील सर्वसामान्यांपासून तर उच्चविद्याविभूषित लोकांचे मन हेलावून टाकणारी ही घटना असून मनुष्याचे वितभर पोट मनुष्याला कुठल्या थराला नेऊन पोहचवेल हे मात्र नक्की सांगता नाही याचे जिवंत उदाहरण आम्हा वरूडवासीयांना आज अनुभवायला मिळाले असून संपूर्ण गावात, परिसरात आज दुःखाचे वातावरण पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना वरूड जहांगीर येथील असून वरूड जहांगीर येथील अल्पभूधारक शेतकरी श्री सुभाष राऊत हा आपल्या परिवारासह तांड्यात राहून शेती करत होते.त्यांना दोन मुले व एक मुलगी असून तीनही विवाहित आहे.अशातच दोन्ही मुले दुसऱ्यांची मजूरी करीत आहे.सुभाष व पत्नी सुरेखा हे आपली शेती करत होते.अशातच शेतीला जंगली जनावरांचा त्रास असल्याने हे दोघेही पती पत्नी सायंकाळी शेतात रखवाली करण्यासाठी गेले होते आणि सकाळी परत येत असताना तलावाच्या विसर्गाच्या परिसरात त्यांचा मृत्यू झाला असून हा मृत्यू पाय घसरल्याने झाला असावा आणि दुसऱ्यांचा एकमेकांना वाचविण्यात झाला असावा असा अंदाज आहे. ही घटना आज सकाळी घडली असून या अगोदर सुद्धा झालेल्या पावसामुळे वाढलेल्या विसर्गामुळे संपूर्ण तांड्यात, गावातील अनेकांच्या घरांना घेरले होते.त्यामध्ये अनेकांचे शेतीचे,घराचे,अन्नधान्याचे नुकसान झाले होते.त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध करून शासनाला जागे केले होते.त्यावेळी तहसीलदार राळेगाव यांनी आपल्या टीमसह पाहणी केली होती.अशातच हा जिवघेणा प्रकार घडल्याने गावकऱ्यांची झोप उडाली असून हा प्रकार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीचा नमुना असून पाटबंधारे विभागाने या गावाला विसर्गापासून गावापर्यंत गावाच्या बाजूने नाल्याचे रुंदीकरण व संरक्षण भिंत उभारली आणि गावातील स्मशानभूमीजवळ नाल्याजवळ उंच पुल उभारला जाईल या शिवाय या गावाचा त्रास कमी होणार नाही.त्याचप्रमाणे स्मशानभुमी जवळून गेलेला रस्ता हा पाटबंधारे विभागाने मातीकाम करून असल्याने या सर्व जिवघेण्या प्रकाराला सामोरे जावे लागत असून याकडे वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, यांनी हा विषय मनावर घेऊन हा प्रश्न निकाली काढायला पाहिजे.अन्यथा असे सुभाष आणि सुरेखा सारखे निसर्गाचे व शासनाच्या चुकीचे बळी पुढेही होणे चालू राहतील. करीता ताबडतोब हा प्रश्न निकाली काढावा.अशा या बळी ठरलेल्या स्व.सुभाष राऊत व त्यांच्या पत्नी सौ सुरेखा सुभाष राऊत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
