
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर या गावात हजरत बाबा फरीद यांचा पुरातन दर्गाह असून मागील पन्नास ते साठ वर्षापासून येथील नागरीक मोठ्या भावभक्तीने मोहरममध्ये सवारीची स्थापना करून पुजा पाठ करतात मोहरम मध्ये बोर्डा बोरकर या गावाला जनु यात्रेचे स्वरूप आलेले असते दुर दुरुन भावीक भक्त दर्शणासाठी बोर्डा बोरकर येथे येत असतात नवसाला पावणारा दर्गाह अशी या दर्गाह ची ओळख असून कुनाच्या घरी नविन बाळ झाल्यास त्याच्या वजणाबरोबर साखर किंवा पेळे मोजन्याची परंपरा आहे दहा दिवस कुठलाही भेदभाव न करता नित्य नियमाणि पूजन केले जाते पावसाने जोरदार हजेरी लावली मात्र भक्तांचा उत्साह कमी झाला नाही आनंदात मोहरम उत्सव साजरा करन्यात आला धोंडूजी कुमरे, साईनाथ आलाम, रिफील नैताम, निखील नैताम हे दहा दिवस दर्गाहची देखरेख करण्यासाठी पुढाकार घेतात आणि त्यांना समस्त गाववासीयांची साथ लाभते दहाव्या दिवशी आंबई गडावर सवारीचे स्नान करून विसर्जण केले जाते
