

प्रतिनिधी:आशिष नैताम
संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे पण आपण आपली काळजी घेतली तर यातुन आपल्याला सावरायला वेळ लागणार नाहि नियमीत योग करा आरोग्य सुदृढ ठेवा असे प्रतिपादन योग दिवसाचे निमीत्ताने जि.प.सदस्य राहुलभाऊ संतोषवार यांनी केले “आरोग्य हि सर्वात मोठी भेटवस्तु आहे मनशांती हि सर्वात मोठी संपती आहे ते योगामुळेच मिळते”आज जागतीक योग दिवसाचे औचित्य साधून जि.प.उच्च प्राथ.शाळा बोर्डा बोरकर येथे योग शिबिराचे आयोजन करन्यात आले यात गावातील यूवकांचा,पुरूषांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला या कार्यक्रमाला जि.प.सदस्य राहुलभाऊ संतोषवार,ग्रा.पं.सरपंच बालाजी नैताम,उपसरपंच महेश कोसरे,सदस्य रोशन नैताम,मुख्याध्यापक कोठारे सर,पेंदोर सर,सामाजीक कार्यकतै बंडुजी नैताम,केशव गेलकीवार,चंद्रशेखर झगडकार,डॉ.कोसरे,तथा गावातील यूवक व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थीत होते
