
प्रतिनिधी :ढाणकी (प्रवीण जोशी)
गेल्या काही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने ईसापुर धरण ९६.४४ टक्के भरले असल्याने ईसापुर धरणाचे गेट द्वारे 35 921 क्युसेस पाणी पैनगंगा नदी पात्रात आज सकाळपासून सोडण्यात येत आहे
एक महिन्यापासून पडणाऱ्या पावसामुळे इसापूर धरण ९६.४४टक्के भरले असल्याने ईसापुर धरणाचे पंधरा सेंटीमीटरने नऊ गेट व एक मीटरने चार गेट द्वारे पस्तीस हजार नऊशे एकवीस क्युसेस पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडले असल्याने नदीला पूर आल्याने ढाणकी गांजेगाव पळसपुर मार्गे हिमायतनगर जाणाऱ्या पुलावर आठ ते दहा फूट पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे पावसाळ्यात गांजेगाव पुलावर नेहमी पाणी राहत असल्याने नेहमी पुलावर पाणी येत असल्याने मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटतो
माननीय खासदार हेमंत पाटील यांनी गांजेगाव येथील जाहीर सभेत गांजेगाव पुलासाठी तीस कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले तरी आतापर्यंत कोणती कारवाई झाली नसल्याने गांजेगाव पुलाचे काम मार्गी लावून पुलाचे काम करून या भागातील जनतेची समस्या सोडवावी अशी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा गांजेगाव पुलाचे काम सुरू होत नाही अशी पळसपुर डोलारी सिरपली शेलोडा शिरंजनी येथील नागरिकांनी केली आहे
