
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव प्रत्येक घरावर तिरंगा लाऊन साजरा करन्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकारने घेतला असून यात संपूर्ण देशवासीयांनी सहभाग घ्यावा यासाठी घर घर तिरंगा अभीयानाची जनजागृती विविध माध्यमातून केली जात आहे ग्रामीण भागातील नागरीकांना घर घर तिरंगाचे महत्व कळावे यासाठी जि. प. उच्च प्राथमीक शाळा बोर्डा बोरकरचे मुख्याध्यापक श्री. कोठारे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थांनी ढोलताशाच्या गजरात व भारमातेचा जय घोष करीत गावात प्रभातफेरी च्या माध्यमातून जण जागृती केली यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक श्री.कोठारे सर, पेंदोर सर, जुमनाके सर, विषय शिक्षीका डंबारे मॅडम, पिंपळकर मॅडम तथा विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
