

देशाचे राष्ट्रध्वज अभिमानाने घरावर फडकवा :- कु. अल्काताई आत्राम
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव प्रत्येक घरावर तिरंगा लाऊन साजरा करन्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकारने घेतला असून यात संपूर्ण देशवासीयांनी सहभाग घ्यावा यासाठी हर घर तिरंगा अभीयान विविध माध्यमातून जनजागृती केल्या जात आहे अशातच ग्रामीण भागातील नागरीकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध व्हावे यासाठी शासनानी प्रत्येक ग्राम पंचायतला राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिले सदर राष्ट्रध्वज तेरा आगष्ट ते पंधरा आगष्ट दरम्यान प्रत्येक घरावर लावायचे असल्याने बोर्डा बोरकर ग्राम पंचायत च्या माध्यमातून आज दिनांक ११/०८/२०२२ रोजी राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले यावेळेस पोंभूर्णा पंचायत समतीचे बि.डि.ओ. श्री.वाळवी साहेब संवर्ग विकास अधिकारी श्री. कुझैकर साहेब,पंचायत समिती च्या माजी सभापती कु. अल्काताई ,सचिव श्री.किशोर ठेंगणे साहेब,सरपंच श्री.बालाजी नैताम,उपसरपंच महेश कोसरे,अंगणवाडी सेविका,आशावर्कर, ग्रा.पं.सदस्य बालचंद कुळमेथे ,सामाजिक कार्यकर्ते आशिष नैताम,संगणक परीचालक दिपक कुनघाडकर, ग्रा.पं.शिपाई उमेश सिडाम,रविंद्र भट व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते….
