कसरगठ्ठा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

पोंभुर्णा तालुक्यातील कसरगठ्ठा येथील श्री.हनुमंत धोडरे वय ५२ वर्ष यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली सदर घटणा दिनांक १९/०५/२०२२ रोज शुक्रवारला सकाळी घडली असून आत्महत्येचे मुळ कारण मात्र अजुनहि समजले नाहि दोन तीन महिन्यापुर्वी हनुमंत धोडरे यांच्या पत्नीला वाघाने ठार केले होते त्यामुळे ते मानसीक तनावात असल्याचे समजते याच नैराश्यातुन यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज गावातील नागरीकांकडून वर्तवील्या जात आहे घटनेची माहिती कसरगठ्ठा गावचे पोलीस पाटील नानाजी धोडरे यांनी भ्रमणध्वणीवरुन पोलीसांना दिली पोंभुर्णा पोलीस घटणास्थळावर दाखल होत सदर घटणेचा पंचणामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्नालय पोंभुर्णा येथे पाठविण्यात आला मृत हनुमंत धोडरे यांच्या पश्चात मुलगा,सुन,नातवंड असा मोठा परीवार असुन घरचा कर्ता पुरूष असा अचानक टोकाची भुमीका घेतल्याने धोडरे कुटुंबीयावर दुखःचे डोंगर कोसळले आहे सदर घटणेचा पुढील तपास पोंभुर्णा पोलीसस्टेशनचे ठाणेदार श्री.धमेंद्र जोशी साहेब यांच्या मार्गादर्शणात पोंभुर्णा पोलीस करीत आहेत