
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
क्रांतीविर बाबूराव शेडमाके जन्म उत्सव समिती राळेगांवच्या वतीने जागतिक आदिवासी दिन शासकीय विश्राम गुहाच्या बाजुला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची प्रतिमा असलेल्या परीसरात साजरा करण्यात आला. यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रविंद्रजी शेराम, बामसेफचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरविंदभाऊ केराम,माजी नगरसेवक अप्सरअली वाल्मीक मेश्राम गुरूजी,रेखाताई कुमरे, प्रदिप मसराम, आदी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीविर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून जागतिक मूलनिवासी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी अरविंदभाऊ केराम, यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून सांगितले या कार्यक्रमाला उपस्थित गजानन तुमराम सर, निलेश हिवरकर, मधुकर पावले, पुरूषोत्तम शेराम, क्रांतीका मसराम, रणजित परचाके, अंकुश वड्डे,धवल घुंगरूड, विनोद सोयाम, लक्ष्मण तोडासे, सचीन महाजन, बंडू मेश्राम,व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
