
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्त घर घर तिरंगा ही मोहीम राळेगाव तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे व गटविकास अधिकारी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळगाव येथे रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत माननीय तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी पवार साहेब, विस्तार अधिकारी मस्के साहेब, मंडळाधिकारी सानप साहेब, कृषी मंडळ अधिकारी ताक संडे साहेब, सरपंच ग्रामपंचायत किशोर धामंदे, तलाठी ब्राह्मण कर ,कृषी सहाय्यक ताकसांडे मॅडम, पोलीस पाटील समीर गुजरकर, उपसरपंच माणिक दडांजे, ग्रामपंचायत सदस्य विनोद बेहरे, विजू टेकाम ,महिला गटाच्या सर्व सदस्या शिक्षक वर्ग गावकरी मंडळी व विद्यार्थी मित्र कर्मचारी रुंद या कार्यक्रमाला हजर होते
